मुंबई : वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची अटक बेकायदा असल्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेची सोमवारी (ता. २७) न्यायालयाने दखल घेतली. तसेच सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली.