ED Raid : दापोली येथील साई रिसॉर्टवर ईडीची टाच

शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या निकटवर्तीय असलेल्या सदानंद कदम यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने कारवाई केली.
Dapoli Sai Resort scam
Dapoli Sai Resort scamesakal
Updated on

मुंबई - सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील साई रिसॉर्टवर बुधवारी टाच आणली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या निकटवर्तीय असलेल्या सदानंद कदम यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई ईडीने केली आहे.

जानेवारीमध्ये ईडीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. परंतु अनिल परब यांना आरोपपत्र आरोपी करण्यात आलेले नाही. या आरोपपत्रात या प्रकरणी 10 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या सदानंद कदम आणि 14 मार्च रोजी अटक करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.

माजी मंत्री अनिल परब यांची साई रिसॉर्टच्या संदर्भात गेल्या काही महिन्यांत ईडीने अनेकवेळा बोलावून चौकशी केली होती. कोस्टल रेग्युलेशन झोनच्या नियमांचे उल्लंघन करून रिसॉर्ट बांधले गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

यापूर्वीची कारवाई

शिवसेना ठाकरे गटातील नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांच्यावर यापूर्वी 4 जानेवारी रोजी इडीने टाच आणत त्यांची तब्बल 10.20 कोटींची संपत्ती तात्पुरती जप्त केली होती. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.

अनिल परब यांनी साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून ओळख लपवली. विभा साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक करून परवानग्या मिळवल्या गेल्याचा इडीने आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

FDA Raids in Vidarbha
Murud Beach dangerous driving incident
Dapoli Mandangad highway widening project delay
woman killed in Dapoli hit and run accident
Marathi News Esakal
www.esakal.com