Covid Center Scam : ED ने पुन्हा बजावलं IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना समन्स

मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांना ईडीचं समन्स
Covid Center Scam
Covid Center Scam

कोव्हीड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीने पुन्हा IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांना समन्स बजावलं. शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना जयस्वाल यांना देण्यात आल्या आहेत. (ED Summons to Sanjay Jaiswal Mumbai News Alleged Covid Center Scam Cas)

कोव्हीड काळात मुंबईत उभारलेल्या जंबो सेंटर्सशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशीसाठी जयस्वाल यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिले.

1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी, जयस्वाल सध्या म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कथित कोविड जंबो सेंटर घोटाळा झाला तेव्हा जयस्वाल हे मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त होते. ईडीला जयस्वाल यांचा जवाब नोंदवायचे आहे.

ईडीने काही दिवसांपूर्वी, कथित जंबो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबईमध्ये तब्बल 15 ठिकाणी छापे टाकले. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या घरीही ईडीच्या छापेमारी करण्यात आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या जवळचे असलेले सुजित पाटकर यांच्याही घरी ईडीचे पथक धडकले होते.

लाइफलाइन रुग्णालयाशी संबंधित ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले.पाटकर यांच्यासह ठाकरे गटाचे आणखी एक पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्याशी संबंधित ठिकाणीही ईडीने छापे टाकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com