esakal | प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक वसंत लॉन्सवर दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक वसंत लॉन्सवर दाखल

आताच समोर आलेल्या माहितीनुसार,  प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाला आहे. विहंग सरनाईक यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक वसंत लॉन्सवर दाखल

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालेत. पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईकांच्या घरीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. यासोबतच त्यांच्या कार्यालयातही ईडीचे अधिकारी पोहोचलेत. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार,  प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाला आहे. विहंग सरनाईक यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसंच विहंग यांना ईडीच्या कार्यालयात नेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विहंग यांना घेऊन ईडीचं पथक हे माजिवाड्यातील वसंत लॉन्स येथे दाखल झाले. तिथे प्रताप सरनाईक यांचा दुसरे पुत्र पूर्वेश सरनाईक यांचं घर आहे.

प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील निवास्थानी आज सकाळी ईडीने धाड टाकली. दरम्यान या संदर्भात ईडीने कोणतीही नोटीस दिली नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा-  बेनामी मालमत्ता जमवली असेल तर कारवाई झालीच पाहिजे: किरीट सोमय्या

सकाळी आठ वाजल्यापासून कारवाई सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सरनाईकांव्यतिरिक्त आणखी काही शिवसेना नेते ईडीच्या रडावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या अन्य काही नेत्यांनाही ईडीकडून नोटीस मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ED team dispatched with Pratap Saranaik son Vihang Saranaik investigate

loading image
go to top