'भुजबळांवरील खटले ईडी न्यायालयात वर्ग करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधातील बेहिशोबी मालमत्तेसंबंधी दोन खटले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयातून (एसीबी) अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) विशेष न्यायालयात वर्ग करण्याची मागणी ईडीच्या वतीने एसीबी न्यायालयात बुधवारी (ता. 19) करण्यात आली.

भुजबळ व त्यांचे पुतणे समीर यांच्याविरोधात ईडीने दोन गुन्हे नोंदविले आहेत. याबाबतचे मूळ खटले एसीबी न्यायालयात सध्या सुरू आहेत. या खटल्याची कारवाई ईडीच्या विशेष न्यायालयात व्हावी, अशी मागणी ईडीच्या वतीने ऍड. प्रदीप घरत यांनी केली. याबाबत एसीबीने बाजू मांडावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे. सिंगापूरमधील भुजबळ यांच्या कंपनीतील अनेक व्यवहारांबाबत ईडीने संशय व्यक्त केला आहे.

Web Title: edi court cases on chagan bhujbal