ईडीची कारवाई आकसापोटी; पालकमंत्री दादासाहेब भुसे यांची टीका

प्रसाद जोशी
Wednesday, 25 November 2020

प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र विहंग यांच्यावरून ईडीने आकसापोटी कारवाई केली आहे, अशी टीका पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केली.

वसई ः सुशांतसिंग राजपूत आत्महत्या व कंगना राणावत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षाची बाजू मांडली होती. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र विहंग यांच्यावरून ईडीने आकसापोटी कारवाई केली आहे, अशी टीका पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केली. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरण हे फक्त बिहार निवडणुकीपुरते होते, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा - सदाभाऊ खोत यांनी घेतली कोशारींची भेट; राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावे सूचवली

वसई विरार शहर महापालिकेच्या सर डी. एम. पेटीट रुग्णालयातील इमारत नूतनीकरण लोकार्पण सोहळा (ता. 25) भुसे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित, वसई विरार शहर महापालिकेचे आयुक्त गंगाधरन डी, शहर अभियंता राजेंद्र लाड, माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी महापौर रुपेश जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती सभापती प्रशांत राऊत, माजी नगरसेवक व महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा - ग्रामीण यात्रांच्या 25 कोटींच्या उलाढालीला ब्रेक; रायगड जिल्ह्यात कोरोनाचा परिणाम

- आरोग्य सुविधांवर भर देणार 

वसई विरारमधील नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावू नये म्हणून सुविधांवर भर देण्यात येईल. कोरोना कळात वसई विरार शहर महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य विभाग तसेच कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली हे कौतुकास्पद आहे. लवकरच शीतशवागृह देखील उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ही भुसे यांनी सांगितले. 
EDs action accidentally Criticism of Guardian Minister Dadasaheb Bhuse

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EDs action accidentally Criticism of Guardian Minister Dadasaheb Bhuse