
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : राज्यातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठीची माहिती पुस्तिका मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या पुस्तिकेत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरील इनहाऊस कोटा, तसेच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत स्पष्टता नसल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. यासह माहिती पुस्तिकेत असंख्य चुका असल्याचे लक्षात येताच, शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करीत, बुधवारी (ता. २१) सुधारीत माहिती पुस्तिका उपलब्ध करणार असल्याचे शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी सांगितले.