
मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागातील मोठा शालेय आयडी घोटाळा विधानसभेत उघड झाला असून, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांना निलंबित करण्याची घोषणा केली आहे. तसेच या प्रकरणाची विशेष तपास पथका (एस.आय.टी.) मार्फत चौकशी केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.