esakal | शिक्षण मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

शिक्षण मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना (Corona) चा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने या जिल्ह्यात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा (school) सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण (Education) विभागाकडून हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण मंत्री (Education Ministry) वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मुख्यमंत्री(CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन या संदर्भातील माहिती दिली असल्याचे अधिकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत राज्यात १५ जुलैपासून आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुढील टप्पा म्हणून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी महत्त्वाची चर्चा झाली असल्याचे समजते. सोबतच अकरावी प्रवेशाच्या सीईटी, खाजगी शाळांना १५ टक्के शुल्क सवलतीचा देण्यात आलेला निर्णय आणि त्यासाठी काढण्यात येणारा अध्यादेश या संदर्भातील चर्चाही झाली असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: राजू शेट्टींनी दिला जलसमाधी घेण्याचा इशारा, पाहा व्हिडिओ

अकरावी सीईटीच्या संदर्भात न्यायालयात आज सरकारकडून भक्कम बाजू मांडल्यानंतर सीईटी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर खाजगी शाळांतील १५ टक्के शुल्क सवलती संदर्भात काढण्यात येणाऱ्या अध्यादेश आणि त्यातील कायदेशीर अडचणींवर या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top