कोरोना पाठोपाठ आता शेतकऱ्यांसाठी पुढील पाच दिवस आहेत अधिक धोक्याचे...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 April 2020

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.

मुंबई - कोरोनामुळे जगभरात थैमान घातलंय. अशात महाराष्ट्रातील सर्वच उद्योगधंदे ठप्प आहेत. शेती आणि शेती व्यवसायाला देखील कोरोनामुळे मोठं नुकसान सहन करावं लागलंय. अशात आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर येतेय.

पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. अवकाळी पावसासह गारपीट देखील होऊ शकते असाही अंदाज मुंबईतील कुलाबा वेधशाळेने वर्तवलाय. नुकताच भारतीय हवामान खात्याने यंदा देशात मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तवला. अशात आता पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी चिंतेचे असणार आहेत. 

मोठी बातमी कसं समजेल सरकार तुमचे  WhatsApp मेसेजेस वाचतंय का ? व्हाट्सऍपचं नवीन फिचर?

मुंबईतील कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रतील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवलाय. कुलाबा वेधशाळेच्या माहितीप्रमाणे एप्रिल १६ ते एप्रिल २० यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसू शकतो. महाराष्ट्रात तापमानाचा पार वाढतोय. महाराष्ट्रात तापमान आता ४० अंश सेल्सियस जवळ गेलंय.अशात मागील आठवड्यात देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये  वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला होता.

मोठी बातमी -  'ते' सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास...

mumbai weather department predicts unseasonal rain and hail storm in few parts of maharashtra
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai weather department predicts unseasonal rain and hail storm in few parts of maharashtra