अकरावी प्रवेशात घोटाळा?

बेकायदा प्राधान्य फेरीसाठी मंत्रालयात हालचाली
education news Eleventh admission scam Illegal admission of 11th mumbai
education news Eleventh admission scam Illegal admission of 11th mumbaisakal

मुंबई : मुंबई परिसरातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत यंदाही बेकायदा प्रवेश प्रक्रिया करण्याच्या हालचाली मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. यासाठी संचालक आणि आयुक्तांनाही अंधारात ठेवून प्रथम प्राधान्य फेरीचा अकरावी प्रवेश प्रक्रियेत समावेश करण्यासाठी तयारी सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गतवर्षी मुंबईत काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रथम प्राधान्य फेरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बेकायदा प्रवेश करण्यात आले होते. यासाठी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने पुण्यात कामकाज पाहणाऱ्या बाह्यसंस्थेच्या व्यक्तीसोबत संगनमत करत प्रवेश प्रक्रिया राबवली होती.

त्यामुळे प्राधान्य फेरीच्या प्रत्येक टप्प्यातील प्रवेश प्रक्रियेदरम्यान मुंबईतील विशिष्ट महाविद्यालयांमध्येच ठरावीक वेळेत प्रवेश झाले होते. ही बाब चर्चेत आल्याने याविषयी शिक्षण संचालनालयाने अशा प्रकारचे प्रवेश रोखण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत प्रथम प्राधान्य फेरीला वगळून गुणवत्तेवर आधारित प्रवेश होण्यासाठी संचालनालयाने पुढाकार घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर अकरावी ऑनलाईन प्रवेशांसाठी नियमित तीन प्रवेश फेऱ्यानंतर एक विशेष फेरीचे आयोजन केले आहे. त्यामुळे बेकायदा प्रवेश करून मोठा आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्रालयातील त्या अधिकाऱ्यासोबतच काही संस्थाचालकांचेही धाबे दणाणले आहेत. परिणामी या अधिकाऱ्याने आता ही प्रथम प्राधान्य फेरी आयोजित करण्यासाठी काही संस्थाचालकांना पुढे करून आपला दबाव निर्माण करण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दबावाला बळी पडू नये

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित असावी, असे न्यायालयाचे आदेश आहेत; मात्र या आदेशाला डावलून गतवर्षी प्रथम प्राधान्य फेरीच्या प्रवेश प्रक्रियेत गुणवत्ता नसलेल्या विद्यार्थ्यांना अनेक नामांकित महाविद्यालयात प्रवेश दिले गेले. त्यामुळे यंदा कोणाचाही दबाव आला, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन या फेरीच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला जाऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

यंदा कसे होणार प्रवेश?

यंदा नियमित तीन प्रवेश फेरीनंतर विशेष राबवली जाणार आहेत. या विशेष फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या तसेच एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त विशेष फेरी राबवली जाईल; मात्र यात प्रथम प्राधान्य फेरीच्या संदर्भात कोणताही उल्लेख या वेळी करण्यात आला नाही. द्विलक्षी अभ्यासक्रमांचे प्रवेश समांतर प्रवेश प्रक्रिया राबवून होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com