esakal | BMC : महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली | Education update
sakal

बोलून बातमी शोधा

school

BMC : महापालिका शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई परिसरातील शाळा (School starts) सोमवारपासून सुरू झाल्यानंतर आता दररोज शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत ( More students) असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. आज सर्वपित्री अमावस्येनिमित्त मराठी शाळांना सुटी असतानाही इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये (English medium school) सात हजार ३३५ विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा: कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस

या दोन्ही माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारपासून (ता. ४) मुंबई महापालिकेच्या ८ वी ते १० वीचे वर्ग असलेल्या ७५५ शाळा सुरू झाल्या असून यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी केवळ उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तब्बल सात हजार ३३२ विद्यार्थ्यानी हजेरी लावल्याची माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.

loading image
go to top