

Eetha Controversy
ESakal
जीवन तांबे
मुंबई : तमाशा आणि लावणी क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच वाद निर्माण झाला आहे. विठाबाईंच्या कुटुंबीयांनी ट्रेलरवरून चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला असून, चित्रपट प्रदर्शनापूर्वी कुटुंबीयांना दाखवावा, अशी मागणी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (सेन्सॉर बोर्ड) आणि चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांना कायदेशीर नोटीस बजावून केली आहे.