अखेर निकृष्ट बांधकाम जमीनदोस्त, 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम

भगवान खैरनार
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मोखाडा : मोखाड्यातील सूर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या संकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. त्यावर सकाळने एका भागात चार मालिका प्रसिद्ध केल्या होत्या. त्याची दखल जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तातडीने घेतली होती व प्रत्यक्ष भेट देऊन सदर बांधकाम पाडून कंत्राटदाराने स्वखर्चाने नव्याने करण्याचे आदेश दिले होते. सदर निकृष्ट बांधकाम आता जमीनदोस्त करण्यात आले आहे. त्यामुळे सुर्यमाळाच्या ग्रामस्थांनी सकाळचे अभिनंदन केले आहे. 

मोखाड्यातील सुर्यमाळ शासकीय आश्रमशाळेच्या संकुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला होता. तसेच ग्रामसभेत या विषयी निर्णय घेऊन, सदरचे बांधकाम पाडण्याची मागणीचा ठराव संमत करण्यात आला होता. तशी तक्रार ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या कडे करण्यात आली होती. त्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट डोंबिवलीच्या ई स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केले होते आणि सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल दिला होता.

असे असताना सदर बांधकाम मुजोर कंत्राटदार वैष्णवी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांनी पुढे सुरूच ठेवले होते. त्यावेळी सकाळने या संपूर्ण आश्रमशाळा बांधकाम संकुलाच्या बांधकामाचा घोटाळाच बाहेर काढून, सलग चार भागात मालिका लाऊन प्रसिद्ध केला होता. त्याची तातडीने जिल्हाधिकारीडॉ. प्रशांत नारनवरे यांनी दखल घेतली आणि प्रत्यक्ष कामाची पाहणी करून, सदरचे बांधकाम पाडण्याचे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाने बांधकाम विभागाला मोठी चपराक बसली असुन आता हे निकृष्ट दर्जाचे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले आहे. सकाळच्या या दणक्याने प्रत्यक्ष कारवाई झाल्याने सुर्यमाळ येथील ग्रामस्थांनी सकाळचे अभिनंदन करून आभार मानले आहेत. 

Web Title: effect of sakal news on inferior construction