esakal | दरवाजा उघडताच पायरीवर दिसला ८ फुटी अजगर, उरणमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

दरवाजा उघडताच पायरीवर दिसला ८ फुटी अजगर, उरणमधील घटना

दरवाजा उघडताच पायरीवर दिसला ८ फुटी अजगर, उरणमधील घटना

sakal_logo
By
सुभाष कडू

मुंबई: तुम्ही दरवाजा उघडला आणि समोर साप किंवा अजगर (Python) दिसला, तर तुमची काय अवस्था होईल?. चिरनेर गावातील विजय मुंबईकर यांच्या कुटुंबीयांची सुद्धा अशीच अवस्था झाली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस (rainy season) असून उरणच्या (uran) चिरनेर गावातील (chirner village) विजय मुंबईकर यांच्या घराच्या पायरीवर चक्क आठ फुटी अजगर बसला होता. मंळवारी रात्री ११.४७ च्या सुमारास हा प्रकार घडला. (eight foot long Python catches at home of vijay mumbaikar in uran chirner village)

नेहमीप्रमाणे मुंबईकर कुटुंबीय झोपण्याची तयारी करत होते. कुटुंबातील काही सदस्य टीव्ही पाहत होते. त्याच दरम्यान त्यांना दरवाजाजवळ काहीतरी आवाज होत असल्याचं लक्षात आले. काहीतरी तिथे आहे, असं त्यांना वाटलं.म्हणून कुटुंबियांनी दरवाजा उघडला, तर समोर चक्क आठ फुटी अजगर बसला होता.

हेही वाचा: दीराने विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, घाटकोपरमधील घटना

अजगराची ताकत लक्षात घेतली, तर प्राणी गिळण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे समोर अजगराला पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाची जी अवस्था होईल, तीच अवस्था मुंबईकर कुटुंबीयांची झाली. त्यांनी लगेच फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) च्या हेल्पलाईनवर संपर्क साधला. फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर तिथे पोहोचले. त्यांनी तो अजगर पकडला व त्याची वनखात्याला कल्पना दिली.

हेही वाचा: "संजय राऊत, तुम्हीही हे ध्यानातच ठेवा..."; चित्रा वाघ भडकल्या

वनखात्यासमक्ष त्यांनी तो अजगर वनपरिक्षेत्रात मुक्त केला. या समयी म्हात्रे भाऊसाहेब, सनी ढोले, मेजर बोरसे, संतोष इंगोले तसेच फॉनचे जयवंत ठाकूर, सृष्टी ठाकूर व राकेश शिंदे हजर होते.

loading image