"जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर", भाषणातील १८ महत्त्वाचे मुद्दे

"जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर", भाषणातील १८ महत्त्वाचे मुद्दे

मुंबई - राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं. यामध्ये मोठ्या संख्येने मनसैनिक सहभागी झाले होते. यानंतर राज ठाकरे यांनी सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केलं. आझाद मैदानात बोलताना, पाकिस्तान आणि बांगलादेशातील अवैध नागरिकांना हाकलूनच द्यावं लागेल, त्याला काही तडजोड केली जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणालेत. आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलंय. उद्या दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, असा सज्जड दम राज ठाकरे यांनी भाषणातून भरलाय. 

भारताने माणुसकीचा ठेका घेतलेला नाही, माझा देश म्हणजे धर्मशाळा नाही असंही राज ठाकरे म्हणालेत. भारतात जे काही अतिरेकी हल्ले झालेत, मग त्यातील मुंबईत झालेले साखळी ब्लास्ट असतील या सर्वांच्या म्होरक्यांना पाकिस्तानने आश्रय दिलाय.  मग तिथे अत्याचार होणाऱ्या हिंदूंना आपण देशात घायचं नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.  

भाषणातील १८ महत्त्वाचे मुद्दे 

  1. आज तुम्ही दाखवलेली ताकद त्याबद्दल मी ऋणी शतशः आहे. मी सांगितलं होतं मोर्चाला उत्तर मोर्चाने असेल. ज्यांनी मोर्चे काढले त्यांना चोख उत्तर दिलंय
  2. देशभरात अनेक मोर्चे निघालेत, त्यांचा अर्थ मला समजाला नाही. जे वर्षानुवर्षे इथे राहतायत त्यांना कोण बाहेर जायला सांगतंय. मग त्यांनी जे कायद्यात नाही त्यासाठी काढलेले मोर्चे कुणाला ताकद दाखवण्यासाठी होते?
  3. हा कायदा १९५५ रोजी आला. त्यावेळेची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. 
  4. केंद्रातील सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी नाही केली तर भाजप सोबत. ज्यावेळी चुका घडतात तेंव्हा मी टीका करतो. राम मंदिर, काश्मीरमधील कलम ३७० यासारख्या मुद्द्यावर मी केंद्राचं अभिनंदन केलंय 
  5. देशात आतंकवादी कारवाया करणाऱ्यांना पाकिस्तान आश्रय देतो. मग तिथे अल्पसंख्यांक असलेल्या आणि त्रास दिल्या जाणाऱ्या हिंदूंना मदत करायला नको का ?  
  6. NRC वर देखील राज ठाकरे यांनी आपलं मत मांडलं. देश काय धर्मशाळा आहे का ? या देशात अनेक प्रश्न आहेत. पण बाहेरून घुसखोरी करणाऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही काही ठेका घेतलेला नाही. 
  7. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशी माणसं सापडली की त्यांना पोलिस २ पर्याय सांगतात. एकतर तुझ्या देशात परत पाठवतो नाहीतर जेलमध्ये जा...  
  8. पुण्यात बांगलादेशी माणसाने मराठी आडनाव लावलं आणि मराठी मुलीशी लग्न केलं. 
  9. बांगलादेश आणि पाकिस्तान्यांसोबत आता नायजेरियन लोकं घुसखोरी करायला लागलेत. मीरा भाईंदरमध्ये जा तिथे ते आलेत. आणि आम्ही नुसतं पाहत बसलोय षंढासारखं.
  10. देशातील आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे असेल तर ते योग्य नाही. 
  11. २००८ मध्ये मोर्चा काढला होता, आमच्या महिला पोलिसांवर हात उचलला होता म्हणून. पोलिसांना हात लावलाय, तुम्हाला हात लावायला वेळ लागेल का ? 
  12. बांगलादेशातून भारतात २ कोटी लोकं आलेत, पाकिस्तानातून नेपाळमार्गे किती आलेत माहित नाही आणि आम्ही हिंदू बेसावध. कारण आम्ही दंगल झाली की हिंदू असतो. 
  13. मुंबईत एक जागा आहे तिथे परदेशातून मुल्ला मौलवी येतायत. हे मी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना सांगणार आहे. हे घडतंय ते पोलिसांकडून समजलं. पण जे घडतंय ते अत्यंत भयंकर आहे. तिथे पोलिसदेखील जायला घाबरतात. आणि ब्लास्ट झाले कि आपण मेणबत्त्या बाहेर काढतो. 
  14. या देशातील मुस्लिमांकडे कशाला पुरावे मागायचा ते इथलेच आहेत. मराठी मुसलमानांना घाबरायची गरज नाही.  
  15. या पोलिसांना ४८ तास द्या. राज्य सरकारला सांगून काही अर्थ नाही केंद्राला सांगायला लागेल. महाराष्ट्रातील क्राईम रेट लगेच कमी होईल.
  16. आज तुम्हाला दिसलं असेल मोर्चाला मोर्चाने उत्तर काय असतं, या पुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल  
  17. केंद्र सरकारने त्वरित कारवाई करत देश साफ करायला हवा.  जिथे भुसभुशीत जामी असते तिथे घुशी होतात. जिथे कंकर दगड असतात तिथे काही होत नाही. 
  18. जसे 'ते' जागरूक आहेत आपण जागरूक आहेत तसं आपणही जागरूक राहायला हवं

eighteen pointers of raj thackerays aazad maidan chale jao rally speech

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com