esakal | "एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"
sakal

बोलून बातमी शोधा

"एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"

गँगस्टर एजाज लकडावाला याला पश्चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली होती

"एवढ्या जणांना खंडणीसाठी धमकावलयं, आता आठवतही नाही"

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई, ता. 02  : गँगस्टर एजाज लकडावाला याला पश्चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली होती. 2004 मध्ये घडलेल्या या गुन्ह्यांबाबत चौकशीत आतापर्यंत एवढ्या जणांना धमकावलंय, त्यामुळे आता आठवतही नाही, असे सांगितले आहे. एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या 80 हून अधिक तक्रारी असून मुंबईत 25 गुन्ह्यांची नोंद आहे.

2004 मध्ये गँगस्टर लकडावालाने पश्चिम उपनगरातील एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावले होते. सुरूवातीला 50 लाख रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्या लकडावालाने शेवटी ही रक्कम 50 हजारांवर आणखी होती. अखेर याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानतंर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. त्यावेळी याप्रकरणी लकडवाला सोडून इतर आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले होते.

महत्त्वाची बातमी : 43 वर्षीय व्यक्तीच्या अन्ननलिकेतून काढला 8 सेंटिमीटरचा ट्यूमर

त्याप्रकरणी लकडवाला फरार होता. अखेर त्याचा ताबा याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष-9 च्या पोलिसांनी घेतला होता. सध्या याप्रकरणी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पण तत्पूर्वी याप्रकरणी चौकशी दरम्यान आरोपी लकडावालाने 2004 मधले काही आठवत नाही, एवढ्या जणांना धमकावलंय, आता आठवत नाही, असे सांगितले होते. गुन्हे शाखेच्या कक्ष-9 कडे लकडावाला विरोधात आणखी दोन खंडणीचे गुन्हे आहेत. त्याप्रकरणी लवकरच त्याचा ताबा घेण्यात आला आहे.

एजाज विरोधात हत्या, खंडणीसारख्या 80 हून अधिक तक्रारी असून मुंबईत 25 गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच 'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर 2 हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना. 1997 मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता. 

महत्त्वाची बातमी : 'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर

बेकायदा टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीने परदेशातून कॉल

हॉटेल व्यावसायिकाला 2004 मध्ये ज्यावेळी लकडावालाने धमकी दिली होती. त्यावेळी तो मलेशियामध्ये होता. पण सुरक्षा यंणांच्या रडावर येऊ नये, यासाठी लकडावाला त्यावेळी अंधेरीतील बेकायदा टेलिफोन एक्सचेंजचा वापर करायचा. या टेलिफोन एक्सचेंजच्या मदतीनेत लकडावाला कॉन्फरन्स कॉलद्वारे खंडणीसाठी धमकावायचा. त्यामुळे त्याचे लोकेशन अंधेरी येत होते. अंधेरीतून या टेलिफोन एक्सचेंजवर कारवाई झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला होता. 

( संपादन - सुमित बागुल )

ejaz lakdawala to mumbai police says i dont remember how many people i have threatened

loading image
go to top