त्या 'लकी' कॉईनने दिला एजाज लकडवालाला पुनर्जन्म; वाचा नक्की काय घडले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

मुंबई पोलिसांच्या चौकशीत दिली माहिती

मुंबई : "दीवार' चित्रपटात ज्याप्रमाणे अमिताभ बच्चनचे प्राण त्याच्या खिशातील बिल्ल्यामुळे वाचले होते, त्याचप्रमाणे गॅंगस्टर एजाज लकडवाला याचे प्राण त्याच्याकडे असलेल्या 'लकी' कॉईनमुळे वाचल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे. बॅंकॉकमध्ये घडलेल्या घटनेत छोटा शकीलच्या हस्तकांनी त्याच्यावर सात राऊंड फायर केले होते.

मोठी बातमी काँग्रेसचे अंडरवर्ल्डशी संबंध होते का ? सोनिया गांधी उत्तर द्या..

कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला तब्बल 23 वर्षांनंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. त्याच्या विरोधात हत्या, खंडणी अशा 80हून अधिक तक्रारी असून, मुंबईत 25 गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी सोनिया अडवानी हिलाला अटक केली होती. तिच्या चौकशीतून एजाजचा ठावठिकाणा लागला होता. जोगेश्‍वरीतील अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा.. शहीद अशोक कामटे, आपली मालमत्ता जाहीर करा..

शाळेत असताना त्याने शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर तो छोट्या-मोठ्या चोऱ्या आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळी "डी गॅंग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे छोटा राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात त्याच्यावर हत्येच्या दोन गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत अटकेत असताना 1997 मध्ये त्याला नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात आणले असताना त्याने पोलिसांना हुलकावणी देऊन पळ काढला होता. त्यानंतर परदेशातून टोळी चालवणाऱ्या लकडावालावर 2003मध्ये बॅंकॉकमध्ये डी कंपनीने गोळीबार केला होता. त्यावेळी त्याच्या शर्टाच्या खिशात त्याचा लकी कॉईन असल्यामुळे त्याला गोळी लागून त्याचे प्राण वाचले होते अशी माहिती लकडावालाने चौकशीत सांगितली.

हे वाचलेय का... सोनम कपूरला लंडनमध्ये का वाटली भीती ? 

त्यानंतर राजन टोळीशी फारकत घेतल्यानंतर एका ठिकाणी स्थिर न राहता एजाज वारंवार आपले ठिकाण बदलत होता. वेगवेगळ्या नावांनी तो सातआठ देशांत वावरत होता. त्यात कॅनडा, ब्रिटन, मलेशिया, कंबोडिया, नेपाळ या देशांचा समावेश आहे. त्याने कॅनडा, मलेशिया आणि ब्रिटनमध्येही मालमत्ता जमवली आहे. 

Ejaz Lakdawala's life was saved by 'Lucky' Coin


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ejaz Lakdawala's life was saved by 'Lucky' Coin