
Latest Shivsena News: ठाण्यासह जिल्ह्याची वाताहत झाली आहे. लोकांना चालता येत नाही; पाणी, कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मात्र अडीच वर्षांत केवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम झाल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला. दिवंगत आनंद दिघे यांच्या जयंत्तीनिमित्त सोमवारी त्यांनी शक्तीस्थळावर हजेरी लावली होती.