
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील प्रत्येक घटकांना शासकीय योजनेत सामावून घेण्याच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून विविध पक्षातील दहा हजार कार्यकर्ते येत्या महिन्याभरात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते प्रकाश पाटील यांनी नुकतीच शहापुरातील कार्यकर्त्यांच्या वेळी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, मनसे व काँग्रेस कार्यकर्त्यांसह आदिवासी संघटनेचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आपआपल्या पक्षाला सोडचिट्टी देऊन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच ठाणे येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.