esakal | खडसेंच्या ED चौकशीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा भाजपला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

खडसेंच्या ED चौकशीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा भाजपला इशारा

खडसेंच्या ED चौकशीनंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा भाजपला इशारा

sakal_logo
By
विराज भागवत

एकनाथ खडसेंची काल 'ईडी'कडून ९ तास चौकशी

मुंबई: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना काल ईडीच्या चौकशीला सामोरे जावं लागलं. तब्बल ९ तास त्यांची चौकशी करण्यात आली. भोसरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी झाली. ही चौकशी सूडबुद्धीने केली जात असल्याची भावना खडसेंनी बोलून दाखवली. त्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनीही भाजपला इशारा दिला. अशा प्रकारच्या यंत्रणा मागे लावून राजकीय गणितं बदलण्याचा प्रयत्न असेल तर तसं काहीही घडणार नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं. (Eknath Khadse Bhosari Land Scam ED Inquiry NCP Leader gives Warning to BJP)

हेही वाचा: प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास  सर्जरी, काळजीचं कारण नाही

ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे, त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचे मानसिक खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता 'ईडी'च्या माध्यमातून जाणूनबुजून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने ही चौकशी सुरू आहे. भाजपला जर वाटत असेल की या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: मुंबई पालिका निवडणुकीत राणे, कृपाशंकर ठरतील गेमचेंजर, कसं ते समजून घ्या...

Nawab Malik

Nawab Malik

"ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशी लावली गेली तरी सत्य आज ना उद्या समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही. त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमध्येही विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात आहे", असा घणाघाती आरोप नवाब मलिक यांनी केला.

loading image