esakal | मुंबई पालिका निवडणुकीत राणे, कृपाशंकर ठरतील गेमचेंजर, कसं ते समजून घ्या...
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पालिका निवडणुकीत राणे, कृपाशंकर ठरतील गेमचेंजर, कसं ते समजून घ्या...

मुंबई पालिका निवडणुकीत राणे, कृपाशंकर ठरतील गेमचेंजर, कसं ते समजून घ्या...

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: खासदार नारायण राणे (narayan rane) यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला समावेश आणि माजी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह (krupa shankar singh) यांचा भाजपा प्रवेश या दोन्ही राजकीय घडामोडींमागे भाजपाची (bjp) काही ठरलेली समीकरणं आहेत. नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रीपद देऊन कोकणात भाजपाचा विस्तार (kokan bjp expansion) आणि पक्ष मजबुती हा भाजपाचा निश्चित उद्देश आहे. पण त्याचबरोबर पुढच्यावर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत राणे आणि कृपाशंकर सिंह यांचा जनाधार वापरुन, मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्याचीही भाजपाची रणनीती असणार. (In Bmc election narayan rane & krupa shankar singh will play important role for bjp)

राणेंना मोठं करुन शिवसेनेला शह द्यायचा, हे राजकीय समीकरण आहेच पण त्याचबरोबर राणेंच्या माध्यमातून मुंबईतील कोकणी मतदारांना आपल्याकडे खेचण्याचाही भाजपाचा प्रयत्न आहे. नारायण राणे कोकणातून येतात. मुंबईत कोकणी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्य करतो. हा कोकणी मतदार गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा हक्काचा मतदार आहे. त्यांच्याच बळावर शिवसेनेने मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवली आहे.

हेही वाचा: दरवाजा उघडताच पायरीवर दिसला ८ फुटी अजगर, उरणमधील घटना

त्याच मतदारांना राणेंच्या माध्यमातून आपल्याकडे वळवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. कृपाशंकर सिंह यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला उत्तर भारतीयांची जास्तीत जास्त मते मिळू शकतात. मुंबई उपनगरात अनेक जागांवर उत्तर भारतीय मते निर्णायक ठरतात. भाजपाकडे आज उपनगरात अनेक उत्तर भारतीय जनाधार असलेले नेते आहेत. पण कृपाशंकर सिंह यांनाही मानणारा एक वर्ग आहे. ही सर्व एकगठ्ठा मते भाजपाला मिळू शकतात.

हेही वाचा: गरोदर मातांना कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका

२२७ सदस्यांच्या मुंबई महानगरपालिकेत जनाधार वाढल्यास भाजपा १०० जागांपर्यंत पोहोचू शकते. गुजराती, मारवाडी समाजाने नेहमीच भाजपाला साथ दिली आहे. नारायण राणे त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे यांच्या आक्रमक नेतृत्वाचा वापर करुन, शिवसेनेला शह देता येऊ शकतो तसेच कृपाशंकर सिंह यांचा काँग्रेस विरोधात वापर करण्याची भाजपाची रणनीती असू शकते. मुंबईतील सर्व समाज घटकांना जोडून महापालिकेतील सत्ता मिळवण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. भाजपाकडे आजच्या तारखेला सर्वच समाज घटकातील प्रभावशाली नेते आहेत.

loading image