esakal | प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास  सर्जरी, काळजीचं कारण नाही
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Ambedkar

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास  सर्जरी, काळजीचं कारण नाही

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष (vanchit bahujan aghadi president) ऍड. प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांच्यावर काल ८ जुलै रोजी  तातडीने बायपास  सर्जरी करण्यात आली. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असं डॉक्टरानीं (doctor) कळवलं आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज (fb page) वरून  रोज देण्यात येईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली. (Emergency bypass surgery on vanchit bahujan aghadi president prakash ambedkar)

कालच वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष (Vanchit Bahujan Aghadi president) प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पुढचे तीन महिने सक्रिय राजकारणापासून दूर राहणार असल्याची माहिती दिली होती. स्वत: प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओ चित्रफीत जारी करुन ही माहिती दिली होती.

हेही वाचा: मुंबई पालिका निवडणुकीत राणे, कृपाशंकर ठरतील गेमचेंजर, कसं ते समजून घ्या...

संदेशामध्ये काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

"मी स्वत: पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमात तीन महिन्यांसाठी कार्यरत राहणार नाही. माझ्या व्यक्तीगत कारणामुळे कार्यरत राहणार नाही. पण पक्ष, संघटन चाललं पाहिजे. आंदोलन सुरु केलीयत. पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आहे. म्हणून पक्षाला अध्यक्ष असणं आवश्यक आहे" असे प्रकाश आंबडेकर म्हणाले होते.

हेही वाचा: मुंबईतील गरोदर मातांना कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका

त्यांनी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश पक्षाच्या अध्यक्षपदी प्रभारी म्हणून रेखाताई ठाकूर यांची नेमणूक करण्यात येत असल्याचं जाहीर केलं होतं. "डॉ. अरुण सावंत, महाराष्ट्र कमिटी, जिल्हा कमिटी इततर सर्व कार्यकर्ते रेखाताईंना मदत करतील. पक्ष यशस्वीरित्या त्याचबरोबर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. आपण सगळेजण रेखाताई ठाकूर यांना सहकार्य करालं" अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली होती.

loading image