C.M. Eknath Shinde : नवी मुंबईमध्ये बालाजी सह पद्मावतीला देखील जागा मिळणार ; बालाजीच्या कृपेने सगळे होईल

नवी मुंबई येथे तिरुमाला तिरुपती बालाजीचे मंदिर उभे राहत आहे. गेल्याच वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जून मध्ये त्याचं भूमिपूजन झाले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे सांगितले.
C.M. Eknath Shinde
C.M. Eknath Shindesakal

डोंबिवली : नवी मुंबई येथे तिरुमाला तिरुपती बालाजीचे मंदिर उभे राहत आहे. गेल्याच वर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जून मध्ये त्याचं भूमिपूजन झाले आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे सांगितले. दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी पद्मावती यांना ही जागा मिळावी अशी मागणी केली. यावर जागा देणारे आम्ही कोण ? बालाजीच्या कृपेने तिथे जागा मिळेल असे विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

तिरुमला तिरुपती देवस्थान आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत भव्य दिव्य स्वरूपात श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कॅबिनेट मंत्री दादा भुसे, रवींद्र चव्हाण, आमदार गिरीश महाजन, नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री शिंदे यांचा पूर्ण परिवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डोंबिवली येथील प्रिमीयर कंपनी मैदानात हा मंगल सोहळा संपन्न झाला. त्यापूर्वी शहरात महोत्सवानिमित्त भव्य शोभायात्राही आयोजित करण्यात आली होती. या महोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना वरील आश्वासन दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, तिरुपती बालाजीला जसा लग्न सोहळा आयोजित केला जातो. डोंबिवलीत खऱ्या अर्थाने तसा अनुभव घेण्याची संधी मिळाली त्याबद्दल खासदार शिंदे यांचे अभिनंदन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

नवी मुंबईत तिरुपती बालाजीचे मंदिर लवकरच उभे राहत आहे. बालाजीच्या कृपेने सगळे होईल. त्यामुळे भाविकांना नवी मुंबईत जाऊन बालाजीचे दर्शन घेता येईल. खरं म्हणजे हे वर्ष खूप आनंदाचे वर्ष आहे जानेवारीमध्ये आयोध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन झाले. राम मंदिर तर झालं पण देशाच्या बाहेर अबुधाबीला पण पंतप्रधान यांच्या हस्ते भव्य दिव्य मंदिराचा लोकार्पण झालं. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी हा भाग्याचा क्षण आहे असे ते म्हणाले.

C.M. Eknath Shinde
Eknath Shinde: बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक घरगडी समजतात

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या ठिकाणी उपस्थित सर्वांचे आभार. सर्वांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे. श्रीकांत शिंदे यांचे आभार आम्हाला या ठिकाणी तिरुपतीचे दर्शन दिले. बालाजी सर्वांची मनोकामना पूर्ण करतात. बालाजी चा आशीर्वाद आम्हाला आणि महाराष्ट्राला लाभावा अशी प्रार्थना केली आहे असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com