BMC Mayor: मुंबईत महापौरपदासाठी एकनाथ शिंदेंचं हॉटेल राजकारण! फॉर्म्युला तयार; भाजप देणार का हिरवा कंदील?

BMC Mayor Mahayuti Formula: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली. सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेवर होत्या.
BMC Mayor Mahayuti Formula

BMC Mayor Mahayuti Formula

ESakal

Updated on

मुंबई महानगरपालिकेत भाजपने महापौरपदाची निवडणूक जिंकली आहे. यापूर्वी गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचे (अविभाजित) वर्चस्व होते. महापौरपदाच्या निवडणुकीबाबत मुंबईत शिवसेनेचे हॉटेल राजकारण रंगू लागले आहे. आज दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड येथे पोहोचण्याचे आदेश देण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये बोलवले आहे. तिथे एक बैठक होत असल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com