
Minister Eknath Shinde
ठाणे: ‘‘विरोधकांना कितीही सुरसुरी-लवंग्या फोडू द्यात. आम्ही काम करतो आणि जनता त्याचे उत्तर मतपेटीतून देते. विरोधकांना आता पराभव दिसत असल्यानेच ते निवडणूक आयोग, ईव्हीएम, महायुतीला दोष देत फिरत आहेत. महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठाम उभी आहे. त्यामुळे आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने आमचीच सत्ता येईल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात व्यक्त केला.