Eknath Shinde : मेट्रो थेट बदलापुरात: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सूतोवाच; निधीची तरतूद
Thane News : ठाणे-भिवंडी-कल्याणपर्यंत येणाऱ्या मेट्रोच्या मार्गात बदल करून खडकपाडामार्गे थेट बदलापूरपर्यंत जाणार असल्याचे ट्विट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. यासाठी १ हजार ५८० कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे.
कल्याण : ठाणे, भिवंडी, कल्याणपर्यंत येणारी मेट्रो खडकपाड्यातून थेट बदलापूरपर्यंत पुढे जाणार आहे. यासाठीच्या निधीची एमएमआरडीएच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याने आरामदायी प्रवासाचे बदलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.