

मुंबई : कांजूरमार्ग कचरा डेपोमुळे स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास रोखण्यासाठी राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. "कचरा डेपो परिसरात दुर्गंधी प्रतिरोधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा, तिथे बांबूंची मोठी लागवड करून 'ग्रीन फॉरेस्ट' तयार करा आणि कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाला गती द्या," असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.