
Deputy CM Eknath Shinde
डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासक आणि त्यांच्याशी संलग्न असलेले सर्व व्यवहारांचा तपास करून यातील सर्वांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना शोधून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रार करून गुन्हे दाखल करावे, असे निर्देश शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना दिले.