उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ करण्यास नकार दिला आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSakal

मुंबई : खरी शिवसेना कोणाची यांसह विविध मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळत निवडणूक आयोगाच्या कामकाजात ढवळाढवळ केली जाणार नसल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Eknath Shinde first reaction after rejecting Uddhav Thackeray petition by Supreme Court)

Uddhav Thackeray and Eknath Shinde
ShivSena : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निर्णय घेण्यास निवडणूक आयोग मोकळं!

एकनाथ शिंदे म्हणाले, खरं म्हणजे लोकशाहीत बहुमताला महत्व असतं हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णायनंतरॉ सिद्ध झालं आहे. आज बहुमत आमच्याकडे आहे, विधानसभेत आणि लोकसभेतही. या देशात जे काही निर्णय होत असतात जे घटना, कायदे यांवर आधारितच होत असतात. म्हणून आज सुप्रीम कोर्टानं देखील या सर्वच बाबींचा विचार करुन विरोधीपक्षाला जी स्थगिती पाहिजे होती ती फेटाळली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
मराठा आरक्षणामुळं रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा; मुख्यमंत्र्यांनी दिली नियुक्तीपत्रे

दरम्यान, निवडणूक आयोग हा स्वतंत्र विभाग आहे. त्यामुळं काही निर्णय हे कोर्टाकडे तर काही निर्णय हे निवडणूक आयोगाकडे होत असतात. त्यामुळं निवडणूक आयोगानं ऐकायचंच नाही अशी जी काही मागणी होती ती सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलीसांप्रमाणं लाभ; राज्य शासनाचा मोठा निर्णय

जे घटनातज्ज्ञ होते त्यांनाही असं वाटत होतं की, आमची बाजू योग्य होती. त्यामुळं शेवटी सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. खरंतर सदस्यत्व रद्दबातल करण्याच्या ज्या काही नोटीसा आमदारांना दिल्या गेल्या होत्या त्या चुकीच्या होत्या. महाविकास आघाडी सरकारनं वाट्टेल तसे निर्णय घेतले होते, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com