नागपूर : मुंबई महापालिकेच्या २०२४ मध्ये उपलब्ध नोंदीनुसार एकूण १ लाख २८ हजार २५२ नागरिकांना श्वानाने चावा घेतला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. याच कालावधीत नागपूर महापालिका क्षेत्रात ९ हजार ४२७ नागरिकांना श्वानदंश झाल्याच्या घटना निदर्शनास आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.