

Ramesh Mhatre
ESakal
मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र याप्रकरणी रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी विनवणी केल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये हवं तर तडीपार करा, पण जेलमधून बाहेर सोडा, अशी विनवणी रमेश म्हात्रे यांनी नुकतीच झालेल्या सुनावणीत केली आहे.