

eknath shinde
esakal
ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी पोलिसांत याबाबत तक्रार केली असून, 'तुषार राणे' या नावाच्या फेसबुक खात्यावरून ही पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.