Eknath Shinde : बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

CM Eknath Shinde says PM Modi is fulfilling Balasaheb thackeray dream ayodhya ram mandir
CM Eknath Shinde says PM Modi is fulfilling Balasaheb thackeray dream ayodhya ram mandirSakal

मुंबई-ठाण्यात एकच जयघोष पाहायला मिळत आहे. जय श्रीराम जय श्रीराम... आपल्याला लवकरच अयोध्येत जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे राम मंदिर उभारत आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न होते. ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत येत्या काळात लवकरच राम मंदिराचे काम पूर्ण होऊन ते भाविकांसाठी खुले होणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले.

कल्याण येथील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. या वेळी आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण शहरप्रमुख रवी पाटील हे उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रासरंग या कार्यक्रमास उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘रासरंग’ या दांडिया उत्सवास उपस्थिती लावली.

CM Eknath Shinde says PM Modi is fulfilling Balasaheb thackeray dream ayodhya ram mandir
CM Eknath Shinde: लवकरच अयोध्येत जायचे आहे, बाळासाहेबांचे स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत

या वेळी शिंदे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना महाविकास आघाडीला टोला लगावला. ‘राज्यात आमचे सरकार येताच सगळे निर्बंध आम्ही उठवले आहेत. मंदिरे खुली केली, सन-उत्सवांवरील बंदी उठवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी मुंबई, ठाण्यासह राज्यात सगळीकडे जय श्रीराम, जय श्रीरामचे गाणे म्हटले जात आहे, इथे ते गाणे लागले का नाही, अशी विचारणा केली. या वेळी हे गाणे लागताच एकनाथ शिंदे यांनी जय श्रीरामची घोषणा देत सांगितले, की अयोध्येत राम मंदिर बनत आहे. मोदीजी ते काम करत आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्या लोकांचे हे सरकार आहे, तुम्हाला जे हवे आहे तेच हे सरकार करेल, असा विश्वास त्यांनी या वेळी जनतेला दिला.

...

‘दुर्गाडी’साठी निधी कमी पडू देणार नाही

दुर्गाडी देवीचे दर्शन हजारो, लाखो भाविक घेत असतात. वर्षानुवर्षे ही परंपरा सुरू आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी ७.५० कोटी मंजूर केले आहेत. त्यात अडीच कोटींची कामे सुरू आहेत. आणखी पाच कोटींची कामे सुरू होतील. आणखी जे काही कामाला पैसे लागतील तेदेखील शासनाच्या वतीने देण्यात येतील. ‘दुर्गाडी’साठी निधी कमी पडू देणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी सांगितले.

CM Eknath Shinde says PM Modi is fulfilling Balasaheb thackeray dream ayodhya ram mandir
Eknath Khadse : ‘केळी विम्याचे पैसे देऊ नका’, असा उल्लेख पत्रात असेल तर राजीनामा देऊ : एकनाथ खडसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com