

Eknath Shinde
esakal
ठाणे : पालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक दिग्गज नगरसेवकांसह नव्या नगरसेवकांना स्थायी समितीचे वेध लागले होते, मात्र समिती सदस्य निवड प्रक्रिया लांबल्याने अनेकांचा हिरमोड झाला होता. अशातच आज (ता. २०) पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती सदस्य निवड प्रक्रिया पार पडली. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून दिग्गज नगरसेवकांना डावलत नव्या शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. या सदस्य निवडीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.