

Eknath Shinde says on Kalu Dam Project
ESakal
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेचे स्वतंत्र धरण असावे. याकरिता काळू धरण उभारण्यासाठी मुख्यमंत्री असताना चालना दिली व त्यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून तत्काळ पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आता या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. पालिका क्षेत्रातील नागरिकांची पाणीटंचाईची समस्या कायमची सुटण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. त्यामुळे येत्या काहीच वर्षांत स्वतंत्र धरणाचा प्रश्न निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.