
ठाणे : अनेक वर्षांपासून मेट्रो प्रवासाचे स्वप्न पाहणार्या ठाणेकरांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ठाण्यातील मेट्रोमार्गिचा ट्रायल रन अर्थात चाचपणी सप्टेंबरला होणार असून डिसेंबर २०२५ ला प्रत्यक्ष मेट्रो धावणार असल्याची आनंदवार्ता खुद्द उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मेट्रोमुळे ठाण्यातील रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होऊन कोंडीतून दिलासा मिळेल अशी अशाही त्यांनी व्यक्त केली आहे.