Dombivli: शिवसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात धिंगाणा! महिला डॉक्टरसह नर्सला मारहाण; कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, काय घडलं?

KDMC Hospital Controversy : शिवसेनेच्या नेत्याकडून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयातील महिला डॉक्टरसह नर्सला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
shivsena leader ramesh mhatre beating female doctor

shivsena leader ramesh mhatre beating female doctor

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर, अन्य एका डॉक्टर तसेच तीन महिला नर्स यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com