
Mumbai Latest News: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-उद्घव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे.
पटेल यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी (ता. २७) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.