
राज्याचं पावसाळी अधिवेश सुरू असून विविध मुद्द्यांवरून सभागृहात वातावरण तापलंय. दरम्यान, अधिवेशन सुरू असतानाच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीतील भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर गेल्याचं सांगण्यात येत आहे. अधिवेशन सुरू असताना अचानक एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलंय.