Eknath Shinde : उद्धव ठाकरे हे भस्म्या रोग झालेला अ‍ॅनाकोंडा, बीएमसीच्या तिजोरीवर २५ वर्षे विळखा घालून... एकनाथ शिंदेंची खोचक टीका

BMC Elections : त्यांनी ठाकरेंवर भ्रष्टाचार आणि मुंबईची लूट केल्याचा आरोप केला.शिंदे म्हणाले की ठाकरेंना “भस्म्या रोग” झाला असून ते सगळं गिळत आहेत.तसेच त्यांनी ठाकरेंवर मतदार याद्या मोजण्याचा आणि पराभव टाळण्यासाठी आरोपांचा खेळ केल्याचा आरोप केला.
Maharashtra Deputy CM Eknath Shinde addressing media after responding to Uddhav Thackeray’s “Anaconda” remark during Shiv Sena’s political face-off in Mumbai.

Maharashtra Deputy CM Eknath Shinde addressing media after responding to Uddhav Thackeray’s “Anaconda” remark during Shiv Sena’s political face-off in Mumbai.

esakal

Updated on

Summary

  1. उद्धव ठाकरेंनी वरळीतील मेळाव्यात अमित शहांना “अॅनाकोंडा” म्हटले.

  2. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनाच “अॅनाकोंडा” म्हटले.

  3. शिंदे म्हणाले की ठाकरे २५ वर्षे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर विळखा घालून बसले आहेत.

ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा काल मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहांचा अ‍ॅनाकोंडा असा उल्लेख केला. त्यांच्या विधानाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोचक प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे हे स्वत:च अ‍ॅनाकोंडा आहेत. गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर मोठा विळखा घालून बसलेले आहेत.या अ‍ॅनाकोंडाचे पोट मुंबईची तिजोरी, अख्खी मुंबई गिळली, रुग्णांची खिचडी, मिठी नदीतील गाळ, रस्त्यावरचे डांबर गिळले तरी त्यांचे पोट भरत नाही अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com