
Summary
उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अमित शहा यांनी १० हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ केला.
वाढवण बंदर, अटल सेतू, नवी मुंबई एअरपोर्ट व मेट्रो-3 प्रकल्पांना केंद्राने निधी दिला.
शिंदेंनी आरोप केला की महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्प ठप्प होते, तर आताच ते पूर्णत्वाला जात आहेत.
युपीएच्या ७० वर्षांच्या कार्यकाळात जेवढा निधी महाराष्ट्राला मिळाला नाही त्याच्या ५ पट निधी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात मिळाला आहे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्वव ठाकरेंना लगावला आहे. काही लोक केंद्राने राज्याला काय दिलं असं सवाल करतात पण त्यांना घ्यायची सवय आहे द्यायची नाही असा निशाणाही त्यांनी यावेळी साधला. गोरेगावमधील नेस्को मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.