
भिवंडी : आगरी कोळी बांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकवीरा आईच्या मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रेस कोडसंदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी ७ जुलैपासून करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्ला एकवीरा आई ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. शुक्रवारी (ता. २७) कार्ला येथे आई एकवीरा देवीच्या मंदिरात विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने ड्रेस कोडसंदर्भात हा ठराव मंजूर केल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी दिली आहे.