esakal | उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा - निवडणूक आयोग

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची तपासणी करण्यास सांगितलंय. 

महत्त्वाची बातमी : मुंबईकरांसाठी खुशखबर! मालमत्ता कराबाबत BMCने घेतला मोठा निर्णय; कोरोना संकटामुळे दिलासा

एका RTI कार्यकर्त्यांकडून याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत  सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDT ला निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासण्यास सांगितलं आहे.  जून महिन्यात निवडणूक आयोगाने निवडणूक प्रतिज्ञापत्रांबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. ज्या प्रतिज्ञापत्रांमध्ये खोटी माहिती आहे किंवा त्याबाबत तक्रारी आल्यात निवडणूक आयोग दखल घेईल असं आयोगाने म्हंटलं होतं. १६ जून रोजी याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती. 

Special Report: कोव्हिडच्या नावाखाली रुग्णालयांचा गोरखधंदा; मान्यता नसतानाही कोरोना रुग्णांवर उपचार

त्यानंतर  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत RTI कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. साधारण महिनाभरापूर्वी ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर एक स्मरणपत्र देखील पाठवण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पुढील पाऊल उचलत CBDT कडे सादर गोष्टी तपासण्याची  विनंती केली आहे. काही मुख्य इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये याबाबतची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 

election commission asked CBDT to check election affedevit of uddhav thackeray aaditya and supriya sule