

BMC
ESakal
मुंबई : चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार आहेत. त्यासाठी नुकतीच प्रभागरचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर रविवारी (ता. १२) निवडणूक आयोगाने आरक्षणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार मागील निवडणुकीतील राखीव प्रभाग कायम ठेवण्याऐवजी अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांच्यासाठी नवे प्रभाग आरक्षित केले जाणार आहेत. अनेक उमेदवारांच्या राजकीय गणितात फेरबदल होण्याची शक्यता आहे.