मनसेने राजमुद्रा वापरल्याबद्दल  निवडणूक आयोगाची नोटीस 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 13 February 2020

मुंबई : पक्षाचा झेंडा बदलल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. पक्षाच्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून खुलासा मागवण्यात आला आहे. 

हेही वाचा - राणीच्या बागेत येणार 'हा' पाहुणा

मुंबई : पक्षाचा झेंडा बदलल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. पक्षाच्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा वापरल्याबद्दल निवडणूक आयोगाकडून खुलासा मागवण्यात आला आहे. 

हेही वाचा - राणीच्या बागेत येणार 'हा' पाहुणा

मनसेने 23 जानेवारीच्या आपल्या महामेळाव्यात पक्षाचा झेंडा बदलत त्यात राजमुद्रेचा अंतर्भाव केला. मनसेच्या या नवीन भूमिकेला काही संघटनांनी विरोध केला. त्यातील संभाजी ब्रिगेड, जय हो फाऊंडेशन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारींची दखल घेऊन निवडणूक आयोगाने ही नोटीस बजावली आहे.

हेही वाचा - फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द

राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थितंतर घडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही कात टाकायचे ठरवले. त्याप्रमाणे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनेसेचे महामेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह जागवला. परंतु या अधिवेशनात मनसेने आपल्या झेंडा आणि अजेंड्यात बदल केला. मनसेने यामाध्यमातून आपल्या नव्या राजकारणाला सुरूवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या जहाल हिंदुत्वाचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न मनसे करणार असल्याचे दिसते. मनसेच्या महाअधिवेशनात त्यांनी आपल्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असल्याने संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघासारख्या संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. या संघटनांच्या आक्षेपाकडे लक्ष मनसेने लक्ष दिले नाही. त्यानंतर बांग्लादेशी अवैध मुसलमानांना हुसकाऊन लावण्यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यातही या झेंड्याचा कार्यकर्त्यांनी वापर केला. झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्याने अखेर या संघटनांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत आयोगाने मनसेला नोटीस बजावली आहे. आता मनसे आयोगाच्या नोटीसीला काय उत्तर देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election Commission Notice on MNS Use of Rajmudra