
सकाळ वृत्तसेवा
मुंबई : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. त्यानुसार, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली आहे. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ यांच्याशी सुसंगत आहेत.