

MNS Petition Triggers Probe Into Unopposed Victories
Esakal
पांडुरंग म्हस्के, मुंबई, ता.५ : महापालिका निवडणुकीत राज्यभरातून विविध ठिकाणांवरून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार कायदेशीर अडचणीमध्ये येऊ शकतात. या विजयी उमेदवारांचे अधिकृत निकाल सोळा जानेवारीपर्यंत जाहीर करण्यात येणार नसले तरीसुद्धा त्यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार मात्र कायम राहील. विजयी उमेदवारांच्या विरोधात होत असलेल्या तक्रारींची शहनिशा निवडणूक आयोग करत असून त्यात काही तथ्य आढळल्यास त्यांची निवड रद्द करून त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्यात येऊ शकते, असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यातही माघार घेणाऱ्या उमेदवाराची तक्रार महत्त्वाची ठरणार असून राजकीय पक्षांच्या म्हणण्याला अर्थ नसल्याचे आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.