

Election Commission Rejects BJP Campaign Song Over Objectionable Word In Mumbai
Esakal
महापालिका प्रचार आता शिगेला पोहोचला असून मतदान अवघ्या आठवड्याभराने होणार आहे. विरोधकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली जात आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं तयार केलेल्या प्रचार गीताला राज्य निवडणूक आयोगानं परवानगी दिलेली नाही. भाजपनं विशेष प्रचार गीत तयार केलं होतं त्यात एका शब्दावरून प्रचार गीत नाकारण्यात आलंय.