

Election Commission
मुंबई : प्रारुप मतदारयादीत समावेश असलेल्या एक कोटी २२ लाख मतदारांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावली जाणार असली तरी त्या मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार नाही. मात्र या मतदारांना त्यांच्या घराच्या पत्यावर तसेच मोबाईल नंबरची नोंद असेल तर व्हॅाट्स ॲपवर देखील आयोगाकडून नोटीस पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदारांची गोपनीयता राखली जावी यासाठी प्रारुप मतदारयादीतील नोटीस बजावल्या जाणाऱ्या मतदारांची नावे जाहीर केली जाणार नसल्याचा पवित्रा आयोगाने घेतल्याचे समजते.